चिन्मय उदगीरकरने शेअर केला रिंकू राजगुरुसोबतचा फोटो, या सिनेमात एकत्र

By  
on  

शुटिंगच्या निमित्ताने बराच काळ एकत्र राहिलेल्या कलाकारांच्यात आपसूक मैत्रीचे बंध तयार होतात. अभिनेता चिन्मय उदगीरकरलाही सेटवर नवी मैत्रिण मिळाली आहे. चिन्मयने नुकताच रिंकू राजगुरुसोबतचा सेल्फी पोस्ट केला. या फोटोला कॅप्शन देताना चिन्मय म्हणतो ‘मेक अप’च्या शुटिंगचा शेवटचा दिवस... मज्जा, मज्जा आणि फक्त मज्जा...’ चिन्मयच्या या पोस्टवरून तो लवकरच रिंकू राजगुरुसोबत मेकअप सिनेमात दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

https://www.instagram.com/p/ByC8w1nJ7ST/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमाचा टीजर अलीकडेच रिलीज झाला होता. या सिनेमात रिंकूचा बिनधास्त अंदाज दिसून येत आहे.  गणेश पंडित हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. सैराटनंतर रिंकू ब-याच काळाने ‘कागर’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं.

Recommended

Loading...
Share