By  
on  

Birthday Special: ‘आर्ची’फेम रिंकू राजगुरुची जादू आजही कायम

रिंकू राजगुरु हे नाव परकं वाटावं इतकं रिंकूचं ‘आर्ची’ हे नाव आपल्या प्रत्येकाच्या जवळचं आहे. रिंकूचा आज वाढदिवस आहे. खाणीतून अचानक हिरा सापडावा तसं नागराज यांनी रिंकूला जगासमोर आणलं. सैराटसाठी विहरीत उडी मारण्यापासून ते बुलेट चालवण्यापर्यंतचं कौशल्य रिंकूने आत्मसात केलं. केवळ अपिअरन्स ना दाखवता पण रिंकूने तिच्या अभिनयाची दखलही रसिकांना घेण्यास भाग पाडलं होतं.

https://www.instagram.com/p/Boy3f48FY5A/?utm_source=ig_web_copy_link

एका सामान्य कुटुंबातून आलेल्या रिंकूने पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली. ‘सैराट’नंतर मात्र तिने एका समंजस मुलीसारखं ब्रेक घेतला आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. तिने यावर्षी बारावीची परिक्षा दिली आणि परिक्षेत घवघवीत यश संपादन केलं. तिने बारावीत ८२ टक्के मार्क मिळवून यश संपादन केलं. त्यानंत्र रिंकू समोर आली ‘कागर’ सिनेमामधून. एका साध्या मुलीचा राजकारणी होण्यापर्यंतचा प्रवास कागरमध्ये होता. या सिनेमात रिंकूचा अभिनय अधिक प्रगल्भ झाल्यासारखा वाटला. हळवी प्रेमिका ते धुर्त राजकारणी तिने उत्तम प्रकारे उभी केली.

https://www.instagram.com/p/BvbuG2_pqrh/?utm_source=ig_web_copy_link

आता ती ‘मेक अप’ सिनेमातून रसिकांच्या समोर येत आहे. यातही तिचा राऊडी लूक समोर येत आहे. रिंकू सोशल मिडियावरही ब-यापैकी अ‍ॅक्टीव्ह आहे. ती वरचेवर तिचे वेगवेगळ्या लूकमधले फोटो रसिकांसोबत शेअर करत असते. अगदी कमी वेळात रसिकांचं अलोट प्रेम मिळवणा-या रिंकूला पीपिंगमूनकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तिला उत्तरोत्तर आणखी यश मिळो ही सदिच्छा

Recommended

PeepingMoon Exclusive