By  
on  

‘Long Distance’ प्रेमातील आंबट गोड क्षणांची गोष्ट ‘मिस यु मिस्टर’चा ट्रेलर

अंतर, स्थळ या गोष्टी प्रेमात गौण असतात असं म्हटलं जातं. पण हे अंतर जेव्हा प्रत्यक्षात वाढतं तेव्हा मात्र नात्यांचा समतोल सांभाळणं तितकंसं सोपं नसतं. मिस यु मिस्टर सिनेमाच्या ट्रेलरमध्येही ‘Long Distance’ प्रेमातील चढ उतार दिसून येत आहेत. अलीकडे अनेक जोडपी ‘Long Distance’ रिलेशनशीपचा पर्याय स्विकारताना दिसतात. पण हा पर्यात कितपत नातं सावरून धरतो हे या सिनेमात दिसत आहे. सिद्धार्थ या सिनेमात वरुण तर मृण्मयी कावेरीच्या भूमिकेत आहे. कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या नवरा बायकोची गोष्ट या सिनेमात गुंफण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=7yQxBdTkPSM

कामनिमित्त परदेशी असलेला वरुण आणि सासू सास-यांसोबत रहात असलेली कावेरी यांच्या नात्यात असलेलं अंतर नातं अधिक मजबूत बनवतं की नात्याचा पाया कमकुवत करतं हे सिनेमात दिसेलच. समीर जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली आहे. थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. हा सिनेमा २१ जून २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive