आपल्या व्यस्त वेळापत्रकातून स्वत:ला काहीसा वेळ देणं अत्यंत गरजेचं असतं. अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही नेमकं हेच ठरवलेलं दिसत आहे. प्राजक्ता सध्या युरोपवारीवर आहे. प्राजक्ता सध्या स्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया, प्राग यांसारख्या देशांमध्ये प्रवासाची मजा लुटत आहे.
https://www.instagram.com/p/BySUvhsDRc8/?utm_source=ig_web_copy_link
या ट्रीपमध्ये तिने आतापर्यंत टाकलेल्या फोटोंवर रसिकांनी दिलखुलास लाईक्स आणि कमेंट केले आहेत. पण नुकतेच प्राजक्ताने टाकलेल्या काही फोटोंमुळे तिच्या फॅन्सच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली आहे. प्राजक्ताने युरोपमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. यात ती एका मुलासोबत दिसत आहे. विशेष म्हणजे प्राजक्ताने या फोटोंना कॅप्शनही बुचकळ्यात टाकणारं दिलं आहे. ती म्हणते, ‘युरोप च्या गल्यांमध्ये रोमॅंटीक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा...’ त्यामुळे तिच्यासोबत असलेली या फोटोतील व्यक्ती खास आहे का हे कळायला मार्ग नाही. प्राजक्ताने अलीकडेच ‘डोक्याला शॉट’ या सिनेमांमधून प्राजक्ताने महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.