By  
on  

सिद्धार्थ जाधवचा हा ‘धमाकेदार’ गाण्यावरील ‘धमाकेदार’ डान्स तुम्ही पाहिलात का?

मराठी सिनेमाचा एनर्जी मॅन म्हणून सिद्धार्थ जाधवकडे पाहिलं जातं. गाणं कोणतंही असो सिद्धार्थची पावलं पुर्ण एनर्जीने थिरकत असतात. त्याने नुकताच ‘लग्नकल्लोळ’ सिनेमातील एका गाण्यावरील डान्सचा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात तो नेहमीच्याच एनर्जीने नाचताना दिसत आहे. हे गाणं आदर्श शिंदेने गायलं आहे. या फोटोला कॅप्शन देताना तो म्हणतो, ‘धमाकेदार गाणं सोबत धमाकेदार आवाज....... फुल एनर्जी, फुल राडा…..सिद्धार्थ ‘लग्नकल्लोळ’ या सिनेमात मयुरी देशमुख आणि भुषण प्रधानसोबत दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/ByUHHBBFVRm/?utm_source=ig_web_copy_link

मोहम्मद बर्मावाला हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात भारत गणेशपुरे,प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर,सुप्रिया कर्णिक, विद्या करंजीकर, अमिता कुलकर्णी, संतोष तिरमखे आणि डॉ. आशिष गोखले  हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगलाबाई अण्णासाहेब तिरमखे हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive