By  
on  

तेजश्री प्रधानचा हा नेहमीपेक्षा वेगळा योगा तुम्ही पाहिलात का?

अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असते. अलीकडेच तिने डोंगराळ प्रदेशात योगा करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या एकंदरीत पेहरावावरून रुटिंगपासून सुट्टी घेऊन ट्रेकिंगला गेली असल्याचं दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणते, ‘धाडसी व्हा, रिस्क स्विकारा, अनुभवाला पर्याय नाही.’ या पोस्टमध्ये तिने जीवलग मैत्रिण सुरुची अडारकरलाही टॅग केलं आहे.

https://twitter.com/tejupradhan0206/status/1135946382789840896

तेजश्रीचा अलीकडेच ‘जजमेंट’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातून तेजश्री प्रधान आपल्याला आता पर्यंत कधीही न दिसलेल्या अशा निराळ्याच भूमिकेत दिसली होती. तेजश्रीने या सिनेमात एका वकिलाची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं खुप कौतुक झालं होतं. याशिवाय तेजश्री ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकातून आस्ताद काळेसोबत दिसली होती. या नाटकातील तिच्या व्यक्तिरेखेला रसिकांनी पसंती दर्शवली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive