By  
on  

आठवणींच्या फोटो फ्रेममधून उलगडत जाणारं ‘स्माईल प्लीज’चं मोशन पोस्टर

प्रसिद्ध फॅशन डिझायनर, दिग्दर्शक विक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये नात्यांच्या गोड आठवणी फोटोफ्रेममध्ये बंदिस्त झाल्या आहेत. या फोटोफ्रेममध्ये एक कुटुंब दिसत आहे. या कुटुंबात मुक्ता बर्वे,प्रसाद ओक, त्यांची मुलगी आणि आजोबा दिसत आहेत. व्हिडियो पुढे जाईल तसं मुक्ताची सोलो फ्रेम दिसते. त्याच्या शेजारी ललितची फ्रेम असते. पुढे पुन्हा मुक्ता आणि प्रसाद यांची एकत्र फ्रेम असते. पुढे मुक्ता आणि आजोबा यांच्यातील नातं उलगडणारी फ्रेम. सगळ्यात शेवटी दिसतेती हातात कॅमेरा घेतलेली आत्मविश्वासपुर्ण हसणारी मुक्ता.

 

 

या सिनेमात नात्यांचा वेगवेगळ्या वळणांवरचा प्रवास पाहायला मिळेल यात शंका नाही. या सिनेमात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर आणि ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित 'स्माईल प्लीज' हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive