By  
on  

करण जोहर सुद्धा म्हणतोय ‘स्माईल प्लीज’, नक्की पाहा हा टीजर

दिग्दर्शक करण जोहर सोशल मिडियावर भलताच अ‍ॅक्टीव्ह असतो. स्वत:बद्द्ल आणि मित्र मैत्रिणींबद्दल अनेक पोस्ट लिहित असतो. आता यात आणखी एका नावाची भर पडली आहे ते म्हणजे विक्रम फडणीस. करणने विक्रम फडणीसला त्याच्या आगामी ‘स्माईल प्लीज’ सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यासंबंधीचं ट्वीट करताना करण म्हणतो, ‘हे एक वचन आहे जे तुमच्या चेह-यावर हसू आणेल. विक्रमचं आणखी दिग्दर्शन. सगळ्या टीमला खुप शुभेच्छा.’ करणने या सोबतच सिनेमाचं टीजरही पोस्ट केलं आहे.

 

या सिनेमाच्या टीजरमध्ये मुक्ता बर्वे फॅशन फोटोग्राफर आहे. यासोबत ती सतत काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे. तेवढ्यात ललितची एंट्री होते. दरम्यान एका शॉटमध्ये प्रसाद ओकही दिसतो. मुक्ता या टीजरमध्ये मॉडर्न करिअरिस्ट वुमनच्या व्यक्तिरेखेत दिसत आहे. यात आदिती गोवित्रिकरचं दर्शन झालं नाही. अर्थातच ती काहीतरी विशेष भूमिकेत असेल यात शंका नाही. एकंदरीत करणने या सिनेमाला शुभेच्छा दिल्यापासून सिनेमाभोवतीचं ग्लॅमर वाढलं आहे यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive