धकाधकीच्या जीवनात माणसाला विरंगुळा हवा असतो. ताण दूर करण्यासाठी काही क्षण निवांत असावेत असं प्रत्येकाला वाटतं. हास्य हे ताण दूर करण्याचं सर्वोत्तम माध्यम आहे. त्यामुळे विनोदी मालिका किंवा नाटकाचा स्वत:चा असा खास प्रेक्षकवर्ग असतो. सध्या रंगभूमीवर रसिकांच्या भेटीला हयांचं करायचं काय? हे विनोदी नाटक येत आहे.
या नाटकात पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले हे कलाकार आहेत. या नाटकाचं संहिता लेखन राजेश देशपांडे यांनी केलेलं आहे. एक वृद्ध जोडपं आणि त्यांचा वाडा विकण्यासाठी आतुर असलेला दलाल यांची गोष्ट या नाटकात दिसून येणार आहे. अशा वेळी नाटकातील पात्रांचे विविध पैलू समोर येताना दिसतील. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १४ जूनला होणार आहे.