By  
on  

सिद्धार्थ मृण्मयी स्टारर ‘मिस यु मिस्टर’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी बहुचर्चित ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून हा सिनेमा २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला होता त्याचबरोबर सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर देखील प्रदर्शित करण्यात आला होता या ट्रेलरला अल्पावधीतच सर्व सोशल मीडिया साईटसवर १ मिलियन व्हियूज मिळाले असून प्रेक्षक याला प्रचंड प्रतिसाद देताना दिसत आहेत. या चित्रपटातील गीते वैभव जोशी यांनी लिहिली असून  आलाप देसाई यांचे संगीत आहे तर सोनू निगम , आनंदी जोशी,आलाप देसाई यांनी गाणे गाईले आहे. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली असून थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. आतापर्यंत ट्रेलरबरोबरच सिनेमाच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सिनेमामध्ये सिद्धार्थ चांदेकर ‘वरुण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ हे दोघे नवं विवाहित जोडपं आहे असं दिसतंय आणि वरुणला कामानिमित्ताने काही दिवसात लंडनला जावं लागत आणि सुरु होत ते 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' यादरम्यान बऱ्याच समस्या येतात असं दिसतंय, मग ते यातुन कसा मार्ग काढतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना २८ जूनला सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा लागेल. हा संपूर्ण सिनेमा 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' वर भाष्य करणारा आहे, जे नवरा बायको एकमेकांपासून कामानिमित्ताने लांब राहतात त्याच्यासाठी आणि जे नवविवाहित जोडपं आहे अश्या सर्वाना हा सिनेमा खूप उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर,राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे.

 

‘मिस यू मिस्टर’चे दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, “ही काही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाही, तर कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एकमेकांवर अतीव प्रेम असणाऱ्यांना एकमेकांपासून दूर रहायची वेळ आली तर ते अंतर फक्त शारीरिक नाही, पण त्यामुळे नात्यामध्ये अंतर पडतं? आणि जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावं, या सर्वांबद्दल हसत-खेळत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे,” ते म्हणतात. मंत्रा व्हिजन ही एक बहुआयामी निर्मिती कंपनी असून अर्थपूर्ण आणि उच्च दर्जाची निर्मिती मूल्य असलेले कार्यक्रम करण्यावर तिचा भर असतो. चित्रपट, डिजिटल मीडिया, नुत्य नाटिका तसेच उर्वशी सारख्या रंगमंच कार्यक्रमात कंपनी कार्यरत आहे.

दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे हे ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाचे निर्माते आहेत. दीपा यांना तब्बल चार दशकांचा गारमेंट आणि निर्यात क्षेत्रातील अनुभव आहे. त्यांनी आत्तापर्यंत चित्रपट,उर्वशी (डान्स ड्रामा) आणि टेलिव्हिजन मालिकांची निर्मिती केली आहे. त्या एक स्वयंनिर्मित उद्योजिका आहेत. सुरेश म्हात्रे हे जाहिरात क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. त्यांनी आत्तापर्यंत २५० हूनही अधिक कॉर्पोरेट आणि जाहिरात लघुपट केले आहेत. इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंटमधील पदवी धारण केलेले म्हात्रे हे कॉर्पोरेट जगतात चार दशकांहूनही अधिक काळ कार्यरत आहेत. त्यांनी २०१४मध्ये डायरेक्टर'स रेअर या अंतर्गत तसेच पीवीआरने प्रस्तुत केलेल्या‘सुलेमानी किडा’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive