बॉलिवूडचे धर्मपाजी म्हणजेच धर्मेंद्र आणि त्यांची मुलं बॉबी व सनी देओल या तिकडीचा ‘यमला पगला दिवाना फिरसे’ हा तिसरा सेनमा आता प्रदर्शनासाटी सज्ज झाला आहे. ही पिता-पुत्रांची जोडी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यात नेहमीच हिट ठरते. महत्त्वाचं म्हणजे, आपले वडिल आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या जीवनावर आधारित सिनेमा तयार करण्याची आपल्याला इच्छा असल्याचे सनी देओल याने नुकेतच एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. ही कहाणी रंजक बनवण्यासाठी सनीला एका उत्तम लेखक आणि दिग्दर्शकाची गरज असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.
धर्मेंद्रजींच्या बायोपिकविषयी अधिक विचारल्यावर सनी म्हणाला, “आज प्रत्येक जण बायोपिक बनवतोय. बायोपिक बनवणं हा जणू एक ट्रेण्डच झाला आहे. मलासुध्दा माझ्या वडिलांवर बायोपिक बनवायचाय. पण यासाठी मी उत्तम लेखक आणि दिग्दर्शकाच्या शोधात आहे. जे धर्मेंद्रजींच्या आयुष्यातील चढ-उतार मनोरंजक आणि खुलवून पडद्यावर मांडतील.
पुढे सनीला तु या बायोपिकमध्ये तरूण धर्मेंद्र साकारणार का असा प्रश्न केला असता तो सांगतो, “अजुन तरी मी याबाबत विचार केलेला नाही. पण मीच का, माझा मुलगासुध्दा युवा धर्मेंद्र यांची भूमिका साकारू शकतो.”
म्हणूनच सर्वांनाच आता धर्मेंद्रजींच्या बायोपिकची उत्सुकता लागून राहिली आहे.