By  
on  

Monsoon special: पावसाच्या रंगील्या वातावरणात ही गाणी तुम्हाला नक्कीच वेड लावतील

पाऊस, चहा आणि सुरेल संगीत याचं नातं अतुट आहे. पावसाच्या रिमझीममध्ये गाणी ऐकताना जितका आनंद रसिकांना होतो, तितकाच गीतकारांना पावसाळी गाणी रचताना होत असावा. म्हणून तर मराठीमध्येही पावसावर अनेक उत्तमोत्तम गाणी आहेत. त्यामुळे तुम्ही पाऊस पडत असताना प्रवासात असा किंवा घरात बसून वाफाळत्या चहाचा आनंद घेत असताना ही मराठी गाणी ऐकायला अजिबात विसरू नका.

अधीर मन झाले: ‘नीळकंठ मास्तर’ या सिनेमातील हे गाणं आजही अनेकांचं आवडतं गाणं आहे. पुजाने या गाण्यात केलेला अभिनय केवळ अप्रतिम असा आहे. या गाण्यात पावसाचा उल्लेख नसला तरी पावसाची दृश्य या गाण्याच्या मोहात पाडतात.


 

भिजून गेला वारा: ‘इरादा पक्का’ या सिनेमातील सिद्धार्थ आणि सोनालीवर चित्रित झालेलं हे गाणं तुमचा मूड रोमॅंटिक करेल. पण सुरेल संगीताने फ्रेश वाटेल यात शंका नाही.

चिंब भिजलेले: पावसात भिजलेली नायक-नायिका आणि त्यांच्यात फुलणारे प्रेम हा तर गीतकाराचा आवडता प्रकार आहे. ‘बंध प्रेमाचे’ या सिनेमातील हे गाणं भिजलेल्या ललनेचं सौंदर्य अधोरेखित करतो.

हरवतो सुखाचा: ‘प्रेमाची गोष्ट’ सिनेमातील पावसाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या गाण्यात अतुल आणि सागरिका घाटगे यांच्या प्रेमातील हुरहूर तुम्हालाही हवीहवीशी वाटेल.

पाऊस असा रुणझुणता: संदीप-सलील जोडीचं ‘पाऊस असा रुणझुणता’ हे गाणं आजही युवावर्गाच्या आवडीचं आहे. जवळच्या व्यक्तीची खास आठवण करून देणारं हे गाणं तुम्हालाही नक्की आवडेल यात शंका नाही.

 

Recommended

PeepingMoon Exclusive