By  
on  

PeepingMoon2019: वर्षाचा मध्यावर पोहोचेपर्यंत या सिनेमांनी जिंकली प्रेक्षकांची मनं,तर यांनी केली निराशा

मराठी सिनेमा कात टाकतोय, बदलतोय अशी चर्चा वरचेवर कानी पडते. पण मागील सहा महिन्यात रिलीज झालेल्या सिनेमांनी त्यांचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या सिनेमापासून ते आतापर्यंत रिलीज झालेल्या सिनेमांनी अनेक वेगवेगळे विषय हाताळले आहेत. आनंदी गोपाळ, भाई: व्यक्ती की वल्ली, ठाकरे यांसारख्या बायोपिकनी गतकाळ सहजरित्या जिवंत केला. भाई: व्यक्ती की वल्लीच्या निमित्ताने मराठीत पुर्वाध आणि उत्तरार्ध असा प्रयोग सिनेमाच्या बाबतीत पहिल्यांदाच झाला. सावटसारख्या सिनेमांनी अंगावर शहारे आणत हटके विषय समोर आणला. पाहुया या यादीत आणखी कोणकोणते सिनेमे आहेत. 
आनंदी गोपाळ:

या सहामाहीत रिलीज झालेल्या सिनेमांपैकी या बायोपिकने रसिकांची खास पसंती मिळवली. भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जीवनपट या सिनेमाच्या निमित्ताने रसिकांसमोर आला होता. 

भाई: व्यक्ती की वल्ली: पुर्वार्ध उत्तरार्ध-

या बायोपिकच्या निमित्ताने पुर्वार्ध आणि उत्तरार्ध असा प्रकार पहिल्यांदाच घडला. पु.ल. देशपांडेंवर आधारित असलेला हा बायोपिक सादरीकरणामुळे विवादाचं कारण बनला होता. 

डोंबिवली रिटर्न:

डोंबिवली फास्ट या सिनेमामुळे वाढलेल्या अपेक्षा डोंबिवली रिटर्न या सिनेमाने फ्लॉप ठरवला. संदीप कुलकर्णी, राजेश्वरी सचदेव आणि हृषीकेश जोशी अशी कास्ट असूनही हा सिनेमा प्रभाव पाडू शकला नाही.
नशीबवान: भाऊ कदम यांची मुख्य व्यक्तिरेखा असलेला हा सिनेमा वेगळ्या कथानकामुळे रसिकांच्या पसंतीस उतरला होता. एका सामान्य माणसाच्या स्वप्नांची कथा या सिनेमात दाखवली होती. 

ठाकरे:

बायोपिकच्या यादीतील तिसरा आणि महत्त्वाचा सिनेमा म्हणजे ठाकरे. हिंदी आणि मराठी भाषेत रिलीज झालेला हा सिनेमा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर बेतला होता. या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली होती. या सिनेमाने निर्मितीचा खर्च वसूल केला.

लकी:

दिग्दर्शक संजय जाधव यांचा सिनेमा म्हटलं की प्रेक्षकांच्या अपेक्षा आपोआप वाढतात. पण या सिनेमाने मात्र प्रेक्षकांची निराशा केली. द्वयर्थी संवाद आणि बोल्ड कंटेटही रसिकांना सिनेमापर्यंत आणू शकला नाही. 
मुंबई-पुणे-मुंबई3:

पहिल्या दोन भागांच्या यशानंतर सतीश राजवाडे स्वप्नील आणि मुक्ताला पुन्हा एकत्र घेऊन आले. तिसरा भाग रिलीज होणारा हा बहुधा मराठीतील पहिलाच सिनेमा असावा. हिट सिनेमांच्या यादीत या सिनेमाचं नाव अपरिहार्य आहे. 

वेडिंगचा शिनेमा:

लग्न आणि त्यातील गोंधळावर आधारलेला आणखी एक सिनेमा म्हणजे वेडिंगचा शिनेमा. गायक सलील कुलकर्णी यांचं दिग्दर्शनातील पदार्पण म्हणून हा सिनेमा विशेष चर्चेत होता. 
कागर:

रिंकूचा ‘सैराट’नंतरचा प्रतिक्षित सिनेमा म्हणून कागरकडे पाहिलं जात होतं. पण रिंकूचा अभिनय वगळता हा सिनेमा प्रेक्षकांना जास्त आकर्षित करू शकला नाही. 

टकाटक :

बोल्ड विषय आणि गरमागरम दृश्य यामुळे सिनेमाला तरुण प्रेक्षकवर्ग लाभला. सिनेमानेही समाधानकारक कमाई केल्याचं समोर आलं आहे. 

रंपाट:

रवी जाधव यांच्या सिनेमाने प्रेक्षकांचा आणि अभिनयचाही अपेक्षाभंग केला. अभिनयचा हा या सहामाहीतील दुसरा फ्लॉप सिनेमा ठरला. त्यापुर्वी त्याचा अशीही आशिकी सिनेमादेखील दणकून आपटला होता. 

डोक्याला शॉट्:

विनोदाचा काहीसा वेगळा बाज या सिनेमाने प्रेक्षकासमोर आणला. सुजय आणि प्राजक्ताची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना भावली. 

ती & ती:

मल्टीस्टारर असूनही फ्लॉप सिनेमांच्या यादीत हा सिनेमा गेला. सोनाली आणि प्रार्थनाचा करिष्माही या सिनेमाला तारू शकला नाही. 

मोगरा फुलला:

विषयाची सुंदर मांडणी आणि कलाकारांचा उत्तम अभिनयाने या सिनेमाला चार चांद लावले. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive