चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजकाल प्रमोशनचे नवनवे फंडे शोधून काढले जात असतात. आगामी 'गर्लफ्रेंड' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ यांनी एक व्हिडीओ तयार केला असून सोशल मीडियावर या हटके प्रमोशन फंड्याची चांगलीच चर्चा होत आहे, आजकालच्या मुलींच्या अनेक सवयी आणि स्वभाव या व्हिडीओ मध्ये अचूकपणे टिपलेले आहेत. उदाहरणार्थ, फोन वर बोलताना घरच्यांच्या कळू नये म्हणून हळू आवाजात बोलणे, बॉयफ्रेंड बरोबर होणाऱ्या छोट्या छोट्या कारणावरची भांडण, कुणी अनोळखी मुलगा सोडायला आपल्यावर हा माझा मावस भाऊ, हा माझा चुलत भाऊ ते थेट हा माझा मानलेला भाऊ आशा विविध मुलांशी जोडलेली भाऊकी. असे अनेक मराठी गर्लफ्रेंडचे गुण अचूकपणे सई आणि अमेयच्या जुगलबंदीने उत्तम रंगल्याचे या व्हिडीओमध्ये बघायला मिळते. या शिवाय, मराठी मुलींचं चहा प्रेम, लग्नात घेतले जाणारे उखाणे आणि धार्मिक वृत्ती असेल तर केले जाणारे उपवासही करताना सई दिसते. खास म्हणजे, गर्लफ्रेंड बद्दलच्या तक्रारी सांगणारे अनेक मोनोलॉग्स आपण हिंदी चित्रपटांमध्ये ऐकले असतील, पण प्रथमच मराठी गर्कफ्रेंड बनणं किती चॅलेंजिंग आहे याचा पाढाच सई वाचून दाखवताना दिसते. अनिश जोग आणि रणजित गुगळे यांची निर्मिती असलेला गर्लफ्रेंड या चित्रपटाचे दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले आहे.
आजच्या डोअर नेक्स्ट जनरेशनचे प्रतिनिधित्व करणारा 'गर्लफ्रेंड ' हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
गर्लफ्रेंड आली खास रे टीव्ही वर भावांनो..!
बघा लवकर आणि शेअर करा तुमच्या गर्लफ्रेंडला...