By  
on  

अडगुलं मडगुलं’ म्हणत जमलीये बाप-लेकामध्ये गट्टी, पाहा ‘बाबा’ सिनेमातील नवं गाणं

अनेकदा आई या विषयावर कितीही लिहिलं-बोललं गेलं असलं तरी ‘बाबा’ या शब्दाचं वलय अजिबात कमी होत नाही. वडिल आणि मुलामधील अशीच हृद्य केमिस्ट्री दिसली आहे बाबा सिनेमातील नव्या गाण्यात. ‘अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं अशी बालगीतासारखी सुरुवात असलेलं हे गाणं वडील मुलाच्या फिलॉसॉफी सहज मांडतं. मंगेश कांगणे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. गायक रोहन प्रधानने या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. तर रोहन रोहन यांचं संगीत आहे.

 

या गाण्यात वडिलांच्या भूमिकेत असलेल्या दीपक डोब्रियाल आणि आर्यन मेघजी यांची केमिस्ट्री दिसून येत आहे. या गाण्यात काही क्षणापुरती नंदिता धुरीही दिसते. गाण्याच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या निसर्ग सौंदर्याने मन सुखावतं या सिनेमात नंदिता पाटकर, चित्तरंजन गिरी, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर आणि बालकलाकर आर्यन मेंघजी यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. राज गुप्ता यांचं दिग्दर्शन असलेला संजय दत्त आणि मान्यता दत्त यांची निर्मिती असलेला 'बाबा' हा सिनेमा २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive