‘येरे येरे पैसा2’च्या म्युझिक लाँच सोहळा दिमाखात

By  
on  

मागील वर्षाची सुरुवात ‘येरे येरे पैसा’ च्या दमदार यशाने झाली. पण आता वर्षाच्या मध्यावर या सिनेमाचा सिक्वेल रसिकांचं मनोरंजन करण्यास तयार झाला आहे. नुकताच या सिनेमाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अनेक कलाकारांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती. सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्या हस्ते ट्रेलर लाँच केला गेला.

या सिनेमात विशेष आकर्षण आहे ते ‘अश्विनी ये ना...’ या गम्मत जम्मत सिनेमातील गाण्याच्या रिक्रिएशनचं! या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा रसिकांना धमाल संगीताची मेजवानी मिळत आहे. "ये रे ये रे पैसा २" या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.

 

प्रसाद ओक, अनिकेत विश्वासराव, आनंद इंगळे, मृण्मयी गोडबोले अशी या सिनेमाची स्टारकास्ट असणार आहे.

येरे येरे पैसा 2 चं लेखन ऋषीकेश कोळी यांनी केलं आहे.

 

 

 अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे.

हा सिनेमा 9 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share