काहीतरी नवं अनुभवण्याचा आनंद सगळ्यात खास असतो: संजय दत्त ‘

By  
on  

सध्या अनेक बॉलिवूडचे कलाकार मराठी सिनेमाच्या निर्मितीमध्ये रस घेताना दिसत आहेत. अभिनेता संजय दत्तही अलीकडेच ‘बाबा’ सिनेमाद्वारे मराठी सिनेमाच्या निर्मितीची धुरा हाताळताना दिसत आहे. यावेळी त्याने या सिनेमाच्या निर्मिती करण्यामागचं कारण रसिकांशी शेअर केलं आहे.

 

तो म्हणतो, ‘या सिनेमाचं कथानक ऐकल्यावरच मी ठरवलं होतं की हा सिनेमा प्रोड्युस करायचा. कारण उत्तम कंटेंट या सिनेमाची जमेची बाजू आहे. हा माझा पहिला सिनेमा असला तरी मी वडिल सुनील दत्त यांना डेडिकेट करण्याचं टाळलं आहे. पण या सिनेमामागची प्रेरणा तेच आहेत. लहान मूल भावनिकदृष्ट्या सर्वात जास्त कुणावर अवलंबून असतं तर पित्यावर असं मला नेहमी वाटतं. दिग्दर्शक राज गुप्ता यांना या सिनेमाचं क्रेडिट जातं. या सिनेमाचं शीर्षक ऐकूनच मी त्याच्या प्रेमात पडलो. या सिनेमाच्या निर्मितीचा आनंद माझ्यासाठी खास होता.’ या सिनेमात मुलाला अत्यंत प्रेमाने वाढवणा-या मुकबधिर दांपत्याची कथा आहे. एक घटना घडते आणि या जोडप्याला मुलाच्या कस्टडीसाठी झगडावं लागतं. ‘बाबा’ हा ह्र्दयस्पर्शी सिनेमा 2 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Recommended

Loading...
Share