By  
on  

मी कल्याणजी-आनंदजी यांचा ऋणी आहे : सुदेश भोसले

गायक सुदेश भोसले यांनी महान संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्या अविस्मरणीय गीतांना उजाळा दिला. पद्मश्री आनंदजी भाई यांच्या उपस्तिथीत मुंबईच्या प्रसिद्ध षण्मुखानंद ऑडिटोरियम येथे 'गीतो का कारवान' हा संगीतमय कार्यक्रम रंगला. 
सुदेश भोसले यांनी कल्याणजी-आनंदजींच्या लोकप्रिय धून मधून,  अपनी तो जैसे तैसे, पल पल दिल के पास, यारी है इमान, सलाम-ए-इश्क मेरी जान, राफ्ता राफ्ता देखो आंख मेरी लडी है, खैके पान बनारसवाला, मेरे अंगने मैं यांसारखी एका पेक्षा एक सरस गाणी गायली. इतकेच नाही तर खुद्द आनंदजी यांनी त्यांना मंचावर साथ दिली आणि त्यांच्या बरोबर गाणी गायली.

 भावुक सुदेश भोसले त्या सुवर्ण काळाची आठवण करत म्हणाले  की, "कल्याणजी-आनंदजी यांचे नेहमीच  माझ्या हृदयात एक खास स्थान आहे. करियरनुसार, मी त्यांचा ऋणी आहे. खूप दिल आहे मला त्यांनी. ते मला नेहमीच वेगवेगळ्या आवाजात गाण्यासाठी प्रोत्साहन करत असतात. त्यांच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की, चित्रपट जगतात मोठी व्यक्तिमत्त्व असले तरीही, ते नेहमीच विनम्र असतात. आजही, जेव्हा मी आनंदजीच्या घरी भेट देतो तेव्हा ती भेट कोणत्याही औपचारिकतेशिवाय असते, ते नेहमीच मला परिवारातील एका सदस्या प्रमाणे वागणूक देतात. अमितजी (अमिताभ बच्चन) ९० च्या दशकात बरेच सारे थेट कार्यक्रम चालवत असत आणि त्यांचे हे कार्यक्रम कल्याणजी-आनंदजी यांच्या ऑर्केस्ट्रा शिवाय होत नसत. जेव्हा ही अमितजी परफॉर्म करायचे तेव्हा मी कल्याणजी-आनंदजी बरोबर शो मध्ये असायचो आणि हे शो एका कुटुंबीय सहलीप्रमाणे असायचे माझ्यासाठी. येथूनच माझी अमितजी यांच्याशी जवळीक वाढत गेली. आज मला आनंद होतोय की मी आनंदजी यांना त्यांच्यासमोर त्यांना आणि  स्वर्गंयीय कल्याणजी यांना हा ट्रीबुट देतोय."

ह्या कार्यक्रमास आनंदजी ह्यांच्या पत्नी शांता बेन शाह हि उपस्थित होत्या. प्रसिद्ध गायिका साधना सरगम, पामेला चोपडा, मुख्तार शाह, तरनुम मल्लिक आणि वैभव वशिस्त यांनी हि ह्या कार्यक्रमात जादुई संगीतकार जोडीची अनेक हिट गाणी गायिली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive