झी मराठीवरील ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेने स्वत:चा असा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. गरीब बिचारा वाटणारा मोहन, त्याची कजाग बायको आणि त्याला मदत करणारी लोभस चेह-याची परी म्हणजेच श्रुती मराठे यांचं त्रिकुट उत्तम जमलं होतं. पण आता या मालिकेचा सीक्वेल येत आहे. ‘भागो मोहन प्यारे’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे.
यात मोहनचं लग्न झालं. नव्या नवरीला घरी घेऊन आलेल्या मोहनचं कौतुक होत असतं. त्याचववेळी मोहनची नवी नवरी माप ओलांडण्यासाठी पाय उचलते. त्याचवेळी सगळे पाहतात की या नव्या नवरीचे पाय उलटे आहेत. आता मोहनचं काय होणार? अशी शंका हा प्रोमो पाहताना येते. या मालिकेत सरिता मेहेंदळे ही अभिनेत्री दिसणार आहे.