चेतन गरुड प्रॉडक्शन्स आणि प्रोफेसर ऐश्वर्या पालकर च्या सुसाट रोमॅंटिक अल्बम्सच्या खजिन्यातलं आणखी एक रत्न लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. तरुणांच्या हृदयाचे ठोके अचूक जाणणारे निर्माते चेतन गरुड सध्या एक रोमँटिक पार्टी सॉंग घेऊन आले आहेत. धुंद पावसाळी वातावरणात 'आभाळ दाटले' म्हणणाऱ्या प्रेयसीची मनमोहक तान कानावर पडताच, प्रत्येक प्रियकराची अवस्था ही 'नभ क्षणात तन-मनात घेत सहारा, मग कोसळल्या जलधारा' अशीच काहीशी होत असते. नेमकं हेच हेरणारा 'आभाळ दाटले' हा आल्बम मनाने तरुण असणाऱ्या साऱ्यांनाच आवडेल असा आहे. चेतन गरुड प्रोडक्शन आणि प्रोफेसर ऐश्वर्या पालकर प्रस्तुत 'आभाळ दाटले' चे युथफूल दिग्दर्शन सुबोध आरेकर यांनी केले आहे.
'आभाळ दाटले' हा अल्बम म्हणजे तरुणाईचा जल्लोष आहे आणि हा जल्लोष प्रांजल पालकर आणि भूषण प्रधान यांच्या मस्तीभऱ्या केमिस्ट्रीने रसिकांच्या मनावर गरुड आणि प्रोफेसर ऐश्वर्या पालकर घालण्यासाठी सज्ज आहे. प्रांजल आणि भूषणची रोमॅंटिक केमिस्ट्री जमून येण्यात या गीतातील बोल आणि संगीताचा मोठा वाटा आहे.प्रणवगिरी पालकर यांनी ही आपली छोटीशी भूमिका केली आहे. मनं जुळवणारं 'आभाळ दाटले' हे गीत लिहिलंय यांनी तर त्यावर पावा आणि स्नेहा आयरे यांनी आपल्या सुरेल आवाजाने स्वरसाज चढवला आहे. शिवाय संगीताची बेजोड साथ दिलीये ती म्हणजे गायक-संगीतकार पावा यांनी. चेतन गरुड प्रोडक्शन्सची खासियत म्हणजे सुंदर लोकेशन्स, होतकरू आणि प्रज्ञावंत कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि उत्तम टेक्निशियन्सची किमया हे गणित ठरलेलंच. जे 'आभाळ दाटले' या नव्या-कोऱ्या अल्बमद्वारा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. हया अल्बमच संकलन सारीका खानविलकर हीने आणि नृत्यदिग्दर्शन सुबोध आरेकर यांनी केल आहे.
'खंडेराया झाली माझी दैना' या यशस्वी सोलो अल्बमनंतर चेतन गरुड यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. एकामागोमाग-एक अशी तब्ब्ल ५ गाणी त्यांनी २०१९ मध्ये रसिक-प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बनवली. 'खंडेराया' प्रमाणेच 'सुरमई', 'आधी व्हतं कडू', 'आली फुलवाली', 'बस बुलेटवर' यांसारख्या धमाकेदार अल्बम्सची निर्मिती केली. याही गाण्यांना रसिकांनी आपल्या पसंतीची पोचपावती दिली असून चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि प्रोफेसर ऐश्वर्या पालकरच्या आगामी 'आभाळ दाटले' या अल्बमला सुद्धा प्रेक्षक डोक्यावर घेतील अशी आशा आहे.