By  
on  

‘ये रे ये रे पैसा 2’ ला मिळाल्या बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून शुभेच्छा

मागील वर्षाच्या सुरुवातीला ‘ये रे ये रे पैसा’ या सिनेमाने धमाल उडवून दिली होती. वर्षाच्या सुरुवातीला या सिनेमाने बिझिनेसही चांगला केला होता. या या सिनेमाचा दुसरा पार्ट येऊ घातला आहे. या सिनेमाला खुद्द बिग बींनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी ट्वीट करत ‘माझ्या शुभेच्छा’ असं म्हटलं आहे सोबतच ‘ये रे ये रे पैसा 2’ च्या ट्रेलरची लिंकही शेअर केली आहे.

 ‘ये रे ये रे पैसा २’ ची निर्मिती अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज यांनी केली आहे. या सिनेमात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. हा धमाल सिनेमा 9 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive