By  
on  

'सेगा' वर थिरकली अप्सरा सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिचा व्हेकेशन मोड एंजॉय करत आहे. काही दिवसांपूर्वी तिचे लंडन व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले होते. सोनालीच्या या लंडन ट्रीपच्या फोटोंना नेटिझन्सनीही भरपूर लाईक्सही दिले होते.

 

आता सोनाली मॉरिशस दौ-यावर गेली आहे. या दौ-यावरील तिचे फोटोही तिने सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. यावेळी तिने तेथील सेगा नृत्यावर थिरकतानाचा व्हिडियोही शेअर केला आहे. यावेळी काळा वनपीस घातलेली सोनाली तेथील पारंपरिक नृत्य सादर करणा-या कलाकारांसोबत थिरकताना दिसत आहे.

 

सोनालीने अलीकडेच तिच्या बदलेल्या हेअरस्टाईलचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडियोतही तिचे शॉर्ट केस दिसून येत आहेत. सोनालीने मॉरिशसच्या बीचवरील निवांत क्षणी काढलेला फोटोही शेअर केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive