By  
on  

भाऊ कदम पुन्हा एकदा या सिनेमातून रसिकांचं मनोरंजन करण्यास सज्ज

भाऊ कदम यांचा सिनेमा म्हणजे मनोरंजनाची फुल टू मेजवानी अशीच रसिकांची खात्री झाली आहे. त्यामुळेच त्याचा आगामी सिनेमा येणार आहे समजल्यावर रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. भाऊ आगामी ‘व्हिआयपी गाढव’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचे पोस्टर रिलीज झालं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @bhaukadamofficial (@get_repost) ・・・ On set of #vipgadhavmovie

A post shared by Sheetal Ahirrao (@sheetalahirraoofficial) on

कल्पराज क्रिएशन प्रस्तुत, ‘व्हिआयपी गाढव’चे डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्न देवचके हे निर्माते आहेत तर संजय पाटील  हे दिग्दर्शक आहेत. भाऊ सोबत या सिनेमात विनोदाची पखरण करायला शितल अहिरराव, भारत गणेशपुरे, विजय पाटकर सोबत पूजा कासेकर, शरद जाधव, शिल्पी अवस्थी हे कलाकार देखील सज्ज झाले आहेत. डॉ. प्रसन्न देवचके यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.

चित्रपटात चार गाणी असून चित्रपटाला अशोक वायंगणकर यांचे संगीत लाभले आहे. तर गीतकार मोमीन कवठेकर आहेत. सिनेमाचे संपूर्ण शुटींग हे अहमदनगर जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावांमध्ये झाले आहे. हा सिनेमा भेटीला कधी येतो याची वाट रसिकही पाहात आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive