By  
on  

ठाण्यात मुलीची हत्या करुन टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या

एक मन हेलावून टाकणारी घटना नुकतीच समोर आली आहे. एका टीव्ही अभिनेत्री असलेल्या आईने आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. प्रज्ञा पारकर आणि श्रुती पारकर अशी मृत मायलेकीची नावं आहेत. ठाण्याच्या कळवा येथील गौरी सुमन सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर या हे कुटुंब राहत होतं. होत्या. दोघांचे मृतदेह कळव्यातील रुग्णालयात नेलं असून घटनास्थळी कळवा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

 प्रज्ञा (४०) या टीव्ही मालिकांमध्ये भूमिका करत होत्या. तर मुलगी श्रुती (१८) १२वीचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता प्रशांत व्यायामशाळेत गेले होते. घरी पत्नी आणि मुलगी या दोघीच होत्या. ९.३० वाजता प्रशांत व्यायामशाळेतून घरी परतल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडल्यानंतर प्रज्ञा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तर, मुलगी श्रुती हिसुध्दा खाली निपचित पडली होती. 

पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या करणा-या प्रज्ञा यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं ह्याच कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलंं नाही. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive