रवी जाधव यांनी मदत करणा-या नागरिकांचे आभार मानण्यासाठी शेअर केला हा व्हिडियो

By  
on  

सध्या सांगली कोल्हापुरमधील पुरग्रस्तांसाठी सध्या सगळीकडून मदतीचा ओघ येत आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारही यावेळी मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेते दिग्दर्शक रवी जाधव यांनी पुरग्रस्त लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. गडकरी रंगायतन आणि काशीनाथ घाणेकर सभागृहात ही मदत गोळा करण्याचं काम सुरु आहे.

रवीने नुकताच या संदर्भात एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये सामान्य नागरिक आणि काही कलाकारही मदतीचा हात देताना दिसत आहेत. रवी या व्हिडियोमधील कॅप्शनमध्ये म्हणतात, ‘आम्हा कलाकारांवर विश्वास ठेवून मदत करणाऱ्या प्रत्येक सृजाण नागरीकांचे शतश: आभार. १४ आॅगस्ट पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ दरम्यान गडकरी रंगायतन आणि काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे तुम्ही आपली मदत देऊ शकता ’ रवी जाधव यांच्या प्रमाणेच सुबोध भावे आणि कुशल बद्रिके यांनीही पुरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

Recommended

Loading...
Share