सांगली-कोल्हापूर शहरात सध्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. या भागात पूराचं यंदा महाभयंकर संकट ओढवलं आहे. आजवर अनेक लोकांनी या पुरात स्वतःचा प्राण गमावला आहे तर अनेक संसार उध्दवस्त झालेत. नागरिकांना पूर जरी आता ओसरला तरी जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. त्यांच्या पुर्नवसनासाठी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून मदतीचा ओघ सुरु आहे. त्यांच्या दु:खावर मायेची फुंकर घालण्याचा सर्वतोपरी प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रातील बांधवांकडून करण्यात येतोय. नाम फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि संवेदनशील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी कोल्हापूरातील शिरोळ येथील पूरग्रस्त भागाला नुकतीच भेट दिली.
ह्या भेटीदरम्यान नानांनी नागरिकांची आपुलकीने विचारपूस केली व १०० टक्के जमीनदोस्त झालेली घरे आणि अंशत: पडझड झालेल्या घरासंदर्भात त्यांनी प्रशासनासोबत चर्चा केली. यामध्ये नाम फाऊंडेशनकडून शिरोळ तालुक्यात ५०० घरे बांधून दिली जाणार असल्याचे त्यांनी एका प्रसिध्द दैनिकाशी बोलताना सांगितले.
सरकारने रमाई योजना , इंदिरा आवास योजना आणि प्रधानमंत्री घरकूल योजना यांच्या अटी शिथील करून द्याव्यात. तसेच या योजनेद्वारे घरकूलसाठी दिले जाणारे अनुदान, निधी सरकारने अदा करावेत. उरलेले पैसे नाम देईल आणि त्या कुटुंबाला पक्के घर उभे करून देण्यात येईल असेही नानांनी यावेळी स्पष्ट केलें.
तुमची थोडीशी मदतही खूप मौल्यवान ठरू शकते.#NaamFoundation #NanaPatekar #MakarandAnaspure pic.twitter.com/h4UIhZb4Ya
— Naam Foundation (@NaamFoundation) August 12, 2019