By  
on  

आणि अमेय वाघचं स्वप्न पुर्ण झालं.....

आपल्या आवडत्या कलाकारासोबत काम करायला मिळावं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. इतकंच नव्हे तर आपण ज्या सीरीजचे चाहते आहोत त्याच्या आगामी भागांमध्ये झळकायला मिळणं ही गोष्ट कलाकारासाठी स्वप्नपुर्तीच असते. अशीच स्वप्नपुर्ती अमेय वाघच्या वाट्याला आली. 

अमेय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स 2'मध्ये एका महत्वपुर्ण भुमिकेत झळकणार आहे. अमेय वाघसाठी ही गोष्ट अत्यंत खास होती. नुकतंच अमेयने 'सेक्रेड गेम्स' मध्ये प्रमुख भुमिका साकारणा-या सैफ अली खानसोबत एक फोटो पोस्ट करुन आपला हा आनंद व्यक्त केला. 

अमेय स्वतः 'सेक्रेड गेम्स' वेबसिरीजचा चाहता आहे. त्यामुळे या वेबसिरीजच्या दुस-या भागात भुमिका साकारायची संधी मिळणं ही अमेयसाठी आनंदाची गोष्ट आहे. 'सेक्रेड गेम्स 2' मध्ये अमेयची भुमिका खलनायकी छटा असलेली आहे. आज 15 ऑगस्ट रोजी 'सेक्रेड गेम्स 2' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive