By  
on  

हेमंत ढोमे का म्हणतोय ‘सासु रॉक्स अनिल शॉक्स!’ जाणून घ्या

खरं तर सासू आणि जावयाचं नातं काहीसं आंबट गोडच असतं. कधी जावयाचा तोरा सासूवर वरचढ असतो तर कधी सासूचा धाक जावयाला घाम फोडतो. पण अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमेला मात्र त्याच्या सासूबाई रॉकिंग वाटतात. हेमंतच्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री क्षिती जोग हिची आई उज्ज्वला जोग या देखील उत्तम अभिनेत्री आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सासु रॉक्स अनिल शाॅक्स! @ujwalajog #malabargold #newad #anilkapoor

A post shared by Hemant Dhome (@hemantdhome21) on

 

आजवर त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनयाची छाप सोडली आहे. आताही त्यांची मलबार गोल्डची एक अ‍ॅड सोशल मिडियावर दिसत आहेत. या अ‍ॅडमध्ये त्या अनिल कपूरसोबत दिसून येत आहेत. या मजेदार अ‍ॅडला पोस्ट करत हेमंत ने ‘सासु रॉक्स अनिल शॉक्स!’ हे मजेदार कॅप्शनही दिलं आहे. हेमंतने अलीकडेच रिलीज झालेल्या ‘ये रे ये रे पैसा 2’ चं दिग्दर्शन केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive