सुपर हॉट अभिनेत्री संस्कृती बालगुडेचे चाहते बरेच आहेत. सोशल मिडियावर ही तिच्या पोस्टवर नेटिझन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. पण संस्कृतीने अलीकडेच शेअर केलेल्या पोस्टमुळे तिचे फॅन्स निराश होण्याचीच शक्यता जास्त आहे. कारण या पोस्टमधून संस्कृतीने तिच्या डेटिंग पार्टनर विषयी लिहिलं आहे.
या पोस्टवर ती म्हणते, प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं की मी कुणाला डेट करत आहे. ‘हा आहे तो रुबाबदार मुलगा. मी जाहीररित्या सांगते की हा गोजिरवणा (टेडी) माझा एकुलता एक बॉयफ्रेंड आहे.’ यात ती नेहा पेंडसेला टॅग करून म्हणते की नेहा आता तुला याच्यासोबत जुळवून घ्यावं लागेल.’ संस्कृतीचा हा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून तिचा पेट डॉग टेडी आहे. तिच्या या पोस्टवर नेहा पेंडसे, आशुतोष पत्की, अभिजीत खांडकेकर यांनीही कमेंट्स केल्या आहेत. तुम्हाला कसा वाटला संस्कृतीचा हा बॉयफ्रेंड?