सावरकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेबाबत सुबोध भावेने केलं हे वक्तव्य

By  
on  

दिल्ली विद्यापीठाच्या आवारात असलेल्या सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी सर्व स्तरातून संताप व्यक्त होताना दिसत आहे. या घटनेबाबत अभिनेता सुबोध भावेनेही संताप व्यक्त केला आहे. त्याने ट्वीट करून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

 

आपल्या ट्वीटमध्ये तो म्हणतो, “स्वा.सावरकरांचे विचार पटायला हवेत किंवा नाही हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे,पण म्हणून त्यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालणं आणि त्याची विटंबना करणं हे निंदनीय आहे.स्वातंत्र्य लढ्यातील सर्वांबद्दल नितांत आदर माझ्या मनात आहे आणि या घटनेचा मी निषेध करतो”, असं म्हणतं सुबोधने या घटनेचा निषेध केला आहे.

Recommended

Loading...
Share