By  
on  

अनुभवा भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक 'फत्तेशिकस्त' सिनेमात , या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

‘फर्जंद’ या सिनेमानंतर इतिहासाचा पट पुन्हा एकदा उलगडणार आहे. ‘भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक’ अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.  पुरेशा सैन्यबळाअभावीही गनिमांची दाणादाण उडवणारी युद्धनिती म्हणून याकडे पाहिलं जातं. याच तंत्रावर बेतलेला 'फत्तेशिकस्त' नावाचा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. फर्जंदनंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर  'फत्तेशिकस्त' हा  इतिहासाची पानं उलगडणारा सिनेमा घेऊन येत आहेत. अभिनेता चिनम्य मांडलेकरच ह्या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.  या सिनेमाचं आज एक नवं पोस्टर प्रदर्शित करण्यासोबतच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखसुध्दा उलगडण्यात आली आहे. येत्या 15  नोव्हेंबर 2019 रोजी  'फत्तेशिकस्त'  सर्वत्र प्रदर्शित होईल. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी धैर्याने, शौर्याने आणि तळपत्या तलवारीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारले. ‘आता थेट घुसायचं आणि गनिम तोडायचा...’ असं लिहिलेल्या या पोस्टरमध्ये शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीचा व त्यांच्या आत्मविश्वासाचा हाच दरारा पहायला मिळतो आहे. ‘गनिमी कावा’ चे तंत्र वापरत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. भारतातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

 

 

'फर्जंद’ या सिनेमानंतर इतिहासाचा पट पुन्हा एकदा उलगडणार आहे. ‘भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक’ असं या सिनेमाची टॅगलाईन आहे. या सिनेमात  मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे अशी कलाकारांची मोठी फौज या सिनेमात दिसणार आहे.   

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive