By  
on  

पाहा 'मला आई व्हायचंय'वर आधारित हिंदी सिनेमा ‘मिमी’चं फर्स्ट पोस्टर, उर्मिला कानटेकरच्या भूमिकेत क्रिती सेनन

सरोगेट आई आणि सरोगेट मुलावर आधारित भारतातला पहिला सिनेमा अशी ओळख असलेला मला 'मला आई व्हायचंय' ने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. या सिनेमाची कथा, दिग्दर्शन, निर्मिती, संवांद आणि गीतलेखन अशी सर्वच धुरा अॅड. समृध्दी पोरे यांनी सांभाळली. अभिनेत्री उर्मिला कोठारे ही या सिनेमात प्रमुख भूमिकेत होती. आता या सुपरहिट मराठी सिनेमावर आधारित एक हिंदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचं फर्स्ट पोस्टर नुकतंच उलगडलं. अभिनेत्री क्रिती सेनन ह्या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकतेय तर पंकज त्रिपाठीसुध्दा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 'टपाल'फेम मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive