बिग बॉस सीझन 2 मधून नावारुपाला आलेले लव्हबर्ड्स म्हणजे शिव आणि वीणा. या जोडीवर घरात असताना कौतुकाचा वर्षाव झालाच पण त्यांना अनेकदा टीकेलाही सामोरं जावं लागलं. पण ही जोडी तरीही त्यांच्या निर्णायावर ठाम राहताना दिसली. घरातून बाहेर आल्यानंतर या दोघांच्या नात्याबद्दलही अनेकांनी शंका उपस्थित केली होती.
पण घराबहेर आल्यानंतरही या दोघांच्यातील प्रेम तसेच कायम असल्याचं दिसून आलं आहे. वीणाने शिवला वाढदिवसाचं सरप्राईज म्हणून हातावर शिवच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला आहे. ‘राजा राणीची लव्हस्टोरी आता सुरु झाली आहे’ असं म्हणत शिवने हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.
चाहत्यांनी ‘शिवीणा’ असं या जोडीचं नवं नावही ठेवलं आहे. आता हे दोघे लग्नाच्या बंधनात कधी अडकतात याचीच वाट सगळे पाहात आहेत.