By  
on  

अभिनेत्री मधुरा वेलणकर आता एका नव्या भूमिकेत

अनेकदा एका कलाकारात अनेक कला दडलेल्या असतात. प्रेक्षकांच्या समोर अनेकदा कला सादर करत असतात. मधुरा आता लेखिका बनली आहे. तिने एका पुस्तकाचे लेखन केलं आहे. या प्रकाशन सोहळ्यासंबंधी तिने अलीकडेच सुतोवाच केलं आहे. मधुरा हा नव्या इनिंगबाबत खुप उत्साहित असल्याचं दिसून आलं.

 

मधुरा नक्की कोणत्या विषयावर पुस्तक लिहित आहे हे समोर आलेलं नसलं तरी त्यामुळे तिच्या पुस्तकाविषयीची उत्सुकता वाढली आहे. मधुराचे वडिल प्रदिप वेलणकर आणि सासरे शिवाजी साटम हे दोघंही उत्तम कलाकार आहेत. पण उत्तम अभिनेत्री असलेल्या मधुराने लेखनाची हटके वाट निवडली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive