By  
on  

Birthday Special : अखेर शिव ठाकरेच्या राणीने घेतली त्याच्या जिजाऊंची भेट

सुरुवातीपासुनच आपल्या प्रेमळ स्वभावाने त्याने घरातील सदस्यांची मनं जिंकली आणि आता थेट शिव ठाकरेने 'बिग बाॅस मराठी 2' च्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. घरात एका कारणाने तो सतत चर्चेत राहिला ते म्हणजे त्याचं आणि सहस्पर्धक असलेली अभिनेत्री वीणा जगतापसोबतचं त्याचं प्रेमप्रकरण. वीणाने नुकतंच तिच्या हातावर शिवचं नाव कोरत त्याला वाढदिवसाची ही अनोखी भेट अॅडव्हान्समध्येच  दिली. त्यानंतर आता शिवने तिला त्याच्या गावी अमरावती नेले आणि आईची भेट घडवून दिली. आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन हा वीणा आणि आईसोबतचा फोटो पोस्ट करत शिवने अगदीच मजेशीर कॅप्शन दिलं आहे. शिव म्हणतो, "अखेर राणीची माझ्या जिजाऊशी भेट झाली तर". हा फोटो आणि कॅप्शन पाहून शिव-वीणाच्या चाहत्यांमध्ये आनंदाला उधाण आलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️Finally.... ️Rani meet aapli jijau️ @veenie.j @colorsmarathiofficial @endemolshineind

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

 

बिग बॉस सीझन 2 मधून नावारुपाला आलेले लव्हबर्ड्स म्हणजे शिव आणि वीणा. या जोडीवर घरात असताना कौतुकाचा वर्षाव झालाच पण त्यांना अनेकदा टीकेलाही सामोरं जावं लागलं. पण ही जोडी तरीही त्यांच्या निर्णायावर ठाम राहताना दिसली. घरातून बाहेर आल्यानंतर या दोघांच्या नात्याबद्दलही अनेकांनी शंका उपस्थित केली होती.

पण घराबहेर आल्यानंतरही या दोघांच्यातील प्रेम तसेच कायम असल्याचं दिसून आलं आहे. वीणाने शिवला वाढदिवसाचं सरप्राईज म्हणून हातावर शिवच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला आहे. ‘राजा राणीची लव्हस्टोरी आता सुरु झाली आहे’ असं म्हणत शिवने हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive