9 कलाकार आणि 6 लोककलांनी सजलेलं ‘हिरकणी’ सिनेमातील शिवराज्याभिषेक गीत पाहिलं का?

By  
on  

अवघ्या महाराष्ट्राला ज्या नावाने स्फुर्ती मिळते ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मराठी जनांचा स्वाभिमान वाढ्वणारी घटना म्हणजे शिवराज्याभिषेक. हा दैदिप्यमान सोहळा सोहळ्याचं रसिकांना पुन्हा एकदा दर्शन घडणार आहे ते हिरकणी सिनेमातून. या गाण्यात 9 कलाकार, 6 लोककला सादर करताना दिसत आहेत. काल या गाण्याचा टीजर रिलीज झाला होता. आज हे नेत्रसुखद गीत रिलीज झालं आहे.

 

या गीतामध्ये शिवाजी महाराज कोण असणार आहेत हे समोर आलेलं नाही. पण एकंदरीत सेट आणि संगीत भव्य म्हणावं असंच आहे. या गाण्यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, जितेंद्र जोशी, सुहास जोशी, हेमंत ढोमे, क्षिती जोग, पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शन जाधव, राहुल रानडे आणि चिन्मय मांडलेकर हे कलाकार दिसून येत आहेत.

सुहास जोशी जात्यावरील ओव्या गाताना, सिद्धार्थ चांदेकर पोवाडा गाताना, पुष्कर श्रोत्री शिव स्तुती गाताना, हेमंत ढोमे शेतकरी गीत गाताना, प्रियदर्शन जाधव धनगरी गीत गाताना, जितेंद्र जोशी सुफी गीत गाताना आणि चिन्मय मांडलेकर अभंग गातना दिसत आहेत. या सहासी लोककलांमधून शिवाजी महाराजांचं कौतुक केलं आहे. कवी भुषण आणि संदीप खरे या गाण्याचे गीतकार आहेत तर अमितराजने यावर संगीतसाज चढवला आहे.  हा सिनेमा 24 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share