सुबोध भावे आणि भरत जाधव ‘आप्पा आणि बाप्पा’ सिनेमात एकत्र

By  
on  

सुबोध भावे ‘तुला पाहते रे’ या मालिकेनंतर कोणत्या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. आता खुद्द सुबोधने त्याच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रसिकांसमोर आणलं आहे. सुबोध आता ‘आप्पा आणि बाप्पा’ या सिनेमातून एकत्र येणार आहेत. या सिनेमात सुबोधसोबत अभिनेता भरत जाधवही दिसणार आहे.

 

या सिनेमाचं पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये सुबोध म्हणतो, ‘आप्पा येतोय बाप्पा सोबत! ११ ऑक्टोबरला तुम्हाला भेटायला...’ यात सुबोधने डोक्यावर पाट घेतला आहे. त्या पाटावर भरत मांडी घालून बसला असल्याचं दिसत आहे. या सिनेमाची पटकथा अरविंद जगताप आणि अश्वनि धीर यांनी लिहिली आहे. गरीमा धीर, जलज धीर हे या सिनेमाचे निर्माते आहेत. सुबोध आणि भरत शिवाय या सिनेमात दिलीप प्रभावळकर आणि शिवानी रांगोळेसुद्धा दिसणार आहे. हा सिनेमा 11 ऑक्टोंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share