रवी जाधव आणि अतुल कुलकर्णीने जागवल्या ‘नटरंग’च्या आठवणी

By  
on  

आज अभिनेता अतुल कुलकर्णीचा वाढदिवस होता. या निमित्ताने त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनीही अतुलला खास अंदाजात विश केलं आहे. रवी पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हणतो,

 

‘हॅपी बर्थडे प्रिय मित्र अतुल कुलकर्णी, तुझ्याबाबत व्यक्त होण्यासाठी मला केवळ एकच शब्द सापडतो तो म्हणजे ‘पॅशन’. तुझं पॅशन अअ‍ॅणि कामाप्रती समर्पण कायमच प्रेरणादायी राहील. आज आणि कायमच तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव होऊ दे’. या सोबतच रवीने एक व्हिडियो पोस्ट केला आहे. ज्यात अतुलने ‘नटरंग’ सिनेमातील गुणा कागलकरच्या व्यक्तिरेखेसाठी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. या सिनेमातील अतुलच्या व्यक्तिरेखेसोबतच त्याच्या ट्रांसफॉर्मेशनचीही चर्चा झाली होती.

Recommended

Loading...
Share