Birthday special: सुरावटींनी प्रत्येकाला ‘याड’ लावणारा संगीतकार: अतुल गोगावले

By  
on  

मराठी संगीतक्षेत्रात ख-या अर्थाने क्रांती आणणारी संगीतकार द्वयी म्हणजे अजय-अतुल. त्यापैकी अतुल गोगावले यांचा आज वाढदिवस आहे. या जोडीने अनेक पुरस्कार स्वत:च्या नावावर केले आहेत. त्यापैकी ‘जोगवा’ सिनेमासाठी मिळालेला 56वा राष्ट्रीय पुरस्कार या जोडीला प्रसिद्धीच्या शिखरावर घेऊन गेला.

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात अजय वाढले. खरं पाहता कुटुंबाला संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मिळालेलं यश खरोखर स्पृहणीय आहे. एकदा एनसीसीच्या कार्यक्रमात जुनी धुन वेगळ्यापद्धतीने सादर केल्याबद्दल त्याला बक्षीस मिळालं होतं. यानंतर अतुल यांच्या कंपोझिंगमधली आवड प्रत्येकाच्या लक्षात आली. संगीताची ओढच अतुलला मुंबईपर्यंत घेऊन आली.

‘विश्वविनायक’ या अल्बमने त्यांच्या संगीतामधील बवनकशी सोन्याची ओळख पटली. अजय अतुलच्या ‘अगंबाई अरेच्चा’ सिनेमातील गाण्यांनी खरी धमाल उडवून दिली. ‘मल्हारवारी...’ या गाण्यांने प्रत्येकाला मोहात पडायला भाग पाडलं. त्यानंतर अनेक मराठी सिनेमांसाठी अतुलचं कंपोझिशन आणि अजयचा आवाज ही ‘Hot favourite choice’ बनले. नटरंगच्या गाण्यांनी अजय-अतुल यांचं नाव सर्वतोपरी पोहोचवलं.

मराठी सिनेमांसोबतच अतुल गोगावलेंच्या कंपोझिशनने हिंदी सिनेमांनाही मोहात पाडलं. सिंघम, बोलबच्चन, अग्नीपथ, पीके आणि अशा ब-याच सिनेमांना अतुलने संगीतसाज चढवला आहे. संगीतकार अतुल गोगावलेला ‘पीपिंगमून मराठी’कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा....

Recommended

Loading...
Share