गणेशोत्सवात कलाकरांच्या घरातील गणपतींना पाहण्यासाठी त्यांचे फॅन्सही उत्सुक असतात. त्यातही खास आकर्षण असतं ते नाना पाटेकरांच्या घरी साज-या होणा-या गणपतीचं. नानाच्या घरी दिवाळीपेक्षा गणपती मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गणपतीला घरी आणून दागिने घालून अकरा दिवस पुजा केली जाते. अकराव्या दिवशी वाजात गाजत मिरवणूक काढून या गणपतीचं विसर्जन केलं जातं.
पण या वर्षी मात्र नानाच्या घरी सगळं शांत शांत आहे. यावेळी नानाने अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला आहे. कारण नानांच्या मातोश्रींचं काही महिन्यांपुर्वीच निधन झालं आहे. नानांच्या आई निर्मला पाटेकर वयाच्या 99 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नानांची आईशी भावनिक नातं होतं. त्यामुळेच त्या गेल्यानंतर या वर्षीच्या गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने करण्याचं ठरवलं होतं.