मराठी सिनेमातील सासू ही व्यक्तिरेखा ज्यांच्याशिवाय अधुरी वाटली अशा उषा नाडकर्णींचा आज वाढदिवस आहे. मराठी सिनेसृष्टीची ‘आऊ’ असं उषाताईंबद्दल म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘सिंहासन’ सिनेमातील शांताच्या व्यक्तिरेखेतून त्यांची सिनेसृष्टीत एंट्री झाली. त्यानंतर मात्र उषाताईंनी अजिबात मागे वळून पाहिलं नाही. अनेक हिंदी मराठी सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये त्यांच्या अभिनानयाची छाप पडली.
स्पष्टवक्तेपणा हा उषा यांच्या स्वभावाचा भाग आहे. त्यामुळेच अनेकदा चुकिच्या गोष्टीबाबत मत व्यक्त करताना त्या अजिबात कचरत नाहीत. ‘माहेरची साडी’ मधील कजाग सासूच्या भूमिकेमुळे अनेक स्त्री प्रेक्षकांनी त्यांच्या नावाने बोटं मोडली असली तरी हे त्यांच्या भूमिकेचं यशच म्हणावं लागेल.
इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील सगळ्यात ज्येष्ठ सदस्य असूनही त्या इतरांच्या तोडीस तोड ठरल्या. उषाताईंनी कजाग, खाष्ट व्यक्तिरेखा साकारल्या असल्या तरी मराठी कलाकारांच्या मात्र लाडक्या आऊ आहेत. ‘पीपिंग मून मराठी’ कडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.....