By  
on  

पाहा Photo: ‘विजेता’ सिनेमातून सुबोध भावेचा नवा लूक आला समोर

अभिनेता सुबोध भावेच्या आगामी सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. त्यामुळेच त्याच्या सिनेमांची आतुरतेने वाट पाहिली जाते. सुबोध मुक्ता आर्ट्स निर्मित आगामी ‘विजेता’ या सिनेमात दिसणार आहे या सिनेमातील लूक त्याने नुकताच शेअर केला आहे.

 

यात सिनेमात तो प्रशिक्षकाच्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सुबोध म्हणतो, ‘मी फक्त तुला धावताना बघत नाहीये,तर मी ही तुझ्याबरोबर धावतोय.’ यावरून सुबोध कुणाला तरी चीअर करत असल्याचं समोर येत आहे. सुभाष घई आता ‘विजेता’ या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहेत.

 

सुबोध भावे आणि पुजा सावंत, नेहा महाजन, माधव देवचके, सुशंत शेलार हे या सिनेमात आहेत.  विजेता हा एक स्पोर्ट्स सिनेमा आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर अ‍ॅथलॅटिक्स, सायकलिंग आणि बॉक्सिंग हे खेळ दिसत आहेत. ‘My Sports: My Soil: My Magic’ अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.  एकंदरीत या सिनेमातून सुबोधच्या अदाकारीची नवी झलक रसिकांसमोर येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive