नुकताच संपूर्ण राज्यभरात गणेश विसर्जन सोहळा पार पडला. मुंबईतही थाटामाटात गणपती बाप्पांचं विसर्जन झालं. पण विसर्जनानंतर मुंबईमधील बीचेसची अवस्था अत्यंत दयनीय होते. सर्वत्र कचरा पसरलेला असतो. यावेळी अनेकजण स्वयंस्फुर्तीने हा कचरा साफ करतात. अभिनेत्री किशोरी शहाणेंनेही काल पती बलराज विज यांच्यासोबत जुहु बीचवर जाऊन कचरा सफाईमध्ये हातभार लावला.
यावेळी शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्या म्हणतात. ‘ माझ्या दिवसाची सुरुवात दिपक वीज यांच्यासोबत बीचची स्वच्छता करण्याने झाली. आपण गणेश चतुर्थी उत्साहात साजरी करतो, पण जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाचं भान राखणं आपलं कर्तव्य आहे.’ किशोरी शहाणे काही दिवसांपुर्वीच बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्या आहेत. सर्वात जास्त वयाच्या स्पर्धक असूनही किशोरींनी इतर स्पर्धकांपेक्षा आपण कुठेही कमी नाही हे दाखवून दिलं होतं.