By  
on  

कौतुकास्पद! व्हिएफएक्सच्या बळावर पहिल्यांदाच होणार 100 मराठी लघुपटांची निर्मिती

चित्रपटसृष्टीमध्ये सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर प्रगती होताना आपण पाहत आहोत, वेगवेगळ्या कथा, संगीतातील नवनवीन प्रयोग, अभिनय कौशल्य या सर्व बाबी आल्याचं. परंतु आता सर्वात जास्त बारकाईने पाहिले जाते ते "व्हिएफएक्स" कडे....

व्हिएफएक्स हे एक असे तंत्रज्ञान आहे की त्या ठराविक दृश्याला जिवंत करते आणि त्यामुळे चित्र अधिक उठावदार दिसते..मराठीत चित्रपटाला सध्या चांगले दिवस आलेलेे आहेत अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आपल्या प्रेक्षकांना नक्की काय हवं आहे हे सिनेमा उद्योजकांनी चांगलंच ओळखलेलं आहे, अशीच एक ऍनिमेशन जगातील नामवंत कंपनी "आयरिऍलिटीज" मराठीतकधीही न झालेला प्रयोग करण्यासाठी सज्ज झालेला आहे.

आयरिऍलिटीज" ऍनिमेशन कंपनी मागच्या दशकापासून अद्यावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये अनेक यशस्वी प्रयोगाने आपलं नावलौकिक केल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळवला आहे... हॉरर आणि सस्पेंस या दोन सर्वातताकदीच्या पण तेवढ्याच आव्हानात्मक विषयांवर तब्बल १०० लघुपटांची निर्मिती करणारआहे. हा मराठी सिनेसृष्टीतील पाहिलावहिला प्रयोग असल्याने सर्वांचे लक्ष याअनोख्या प्रयोगाकडे वेधलेलं आहे. 

आयरिऍलिटीज ऍनिमेशन कंपनीने शंभर कोटीच्या क्लब मध्ये जाणारी पहिली भारतीय ऍनिमेटेड फिल्म"४ साहेबजादे" ची निर्मिती केली आहे तसेच सध्या चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध क्रिकेटपटू 'विराटकोहली' ची "सुपर व्ही" या ऍनिमेशनपटावर देखील काम चालू आहे. आयरिऍलिटीज कंपनीचे सीईओ प्रसाद अजगांवकर गेली अनेक वर्ष ऍनिमेशन क्षेत्रात कमालीची कामगिरी करत असून आता बॉलिवूड आणि हॉलिवूड नंतर तेमराठीतदेखील आपला यशाचा झेंडा रोवण्यासाठी उत्सुक आहेत.

याप्रसंगी निर्माते प्रसाद अजगांवकर सांगतात "आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की, आयरिऍलिटीज सध्या हॉलिवूड तसेच बॉलिवूडऍनिमेशन क्षेत्रात कमालीची कामगिरी बजावत आहेत आणि आता त्याच जोशात आम्ही मराठी सिनेक्षेत्रात झेप घेत आहोत. १०० लघुपटांचे आव्हान जितके मोठे आहे तितकंच आयरिऍलिटीज साठी सोप्प कारण त्यांचा स्वतःचा स्वतंत्र व्हिएफएक्स स्टुडिओ असल्यामुळे भविष्यात चित्रपट संकलन करणे सोईस्कर जाणार आहे."

सध्याही कंपनी काही नामवंत टेलिव्हिजन चॅनेल तसेच ३ मोठ्या ऍनिमेशन सिनेमांचे काम करत आहे. मराठीत या १०० चित्रपटांची क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून अभिनेत्री रीना अगरवाल कार्यरत होणार आहे... 

या प्रोजेक्ट ची क्रिएटिव्ह बाजू सांभाळणारी अभिनेत्री रीना अगरवाल सांगते ,"रुपेरी पडद्यावर आजवर मी काम केले आता या पडद्यामागे काम करण्याची संधी मला प्रसाद आणि आयरिऍलिटीज कंपनीने दिली आहे यासाठी त्यांचे मनापासून आभार.'आयरिऍलिटीज' मराठीत हा आगळावेगळा प्रयोग करत आहे आणि आपण त्याचा एक महत्वाचा भाग आहोत ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive