By  
on  

मुंबईतील ट्रॅफिक जाममुळे गायक शंकर महादेवनना सहन करावा लागला मनस्ताप

मुंबईमध्ये निर्माण होत असलेली ट्रॅफिक जामची समस्या मुंबईकरांसाठी नवीन नसली तरी दिवसेंदिवस असह्य होताना दिसत आहे. अनेकदा कलाकारही याबद्दल सोशल मिडियावर बोलताना दिसतात. मध्यंतरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही ट्रॅफिक जॅममुळे शुटिंग लोकेशनवर लोकलने प्रवास करून पोहोचावं लागलं होतं. आता अभिनेता, गायक शंकर महादेवनला देखील अशा प्रसंगाचा सामना करावा लागला.

 

शंकर यांना ट्रॅफिक जॅममुळे रेकॉर्डिंग कॅन्सल करावं लागलं. रेकॉर्डिंगसाठी शंकर घरातून निघाले होते. पण ट्रॅफिकमुळे त्यांना रेकॉर्डिंगच्या ठिकाणी वेळेत पोहोचता आलं नाही. परिणामी हे रेकॉर्डिंग रद्द करावं लागलं. महादेवन यांनी सोशल मिडियावर याबाबतचा संताप व्यक्त केला आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘ मी नवी मुंबईहून रेकॉर्डिंसाठी सकाळी 10 वाजता निघालो. पण ट्रॅफिक जॅममुळे मला अंधेरीला पोहोचायलाच जवळपास दुपारचे 3 वाजले. त्यामुळे रेकॉर्डिंग कॅन्सल करावं लागलं. मुंबईच्या या ट्रॅफिकमध्ये कामाचं नियोजन करावं तरी कसं?’ शंकर महादेवन यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाद्वरे सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive