अभिनेत्री रश्मी अनपटच्या चिमुकल्याचे फोटो पाहिले का?

By  
on  

झी युवावरील ‘फ्रेशर्स’ मालिकेतील मनवा राजेची भूमिका साकारलेली रश्मी अनपट तुम्हाला आठवत असेल. लोभस चेहरा लाभलेली रश्मी पुढचं पाऊल, सुवासिनी या मालिकांमध्येही झळकली होती. याशिवाय ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतील तिने साकारलेली ईश्वरीही अनेकांच्या लक्षात असेल. याशिवाय रश्मीने ‘अवताराची गोष्ट’ या सिनेमातही काम केलं आहे. ‘जेव्हा रायगडाला जाग येते’ या नाटकाच्या दरम्यान रश्मीची ओळख अभिनेता अमित खेडेकरशी झाली. अमित-रश्मी प्रेमात पडले आणि मग विवाहबंधनात अडकले. या जोडीला ‘अभीर’ नावाचा छानसा मुलगा आहे. रश्मीने ‘अभीर’ असं मुलाचं नाव ठेवलं आहे. ती मुलाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही तिने मुलासोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. पाहू काही फोटो.

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share