By  
on  

सिंगापुर चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमाचा डंका, ‘माई घाट’ सिनेमाचा सन्मान

आई तिच्या मुलासाठी काहीही करु शकते. अगदी असच एका आईने पोलीस यंत्रणेविरोधात दिलेला लढा ‘माई घाट : क्राइम नं. 103/2005’ या सिनेमात दाखवला गेला आहे. या सिनेमाने सिंगापुर चित्रपट महोत्सवात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे. मराठी सिनेमासाठी ही बाब नक्कीच गौरवाची आहे कारण असा सन्मान मिळवणारा हा पहिलाच सिनेमा आहे.

या पुरस्कारासाठी अंतिम सहा सिनेमांमधून या सिनेमाची निवड झाली. हा सिनेमाची निर्मिती अल्केमी व्हिजन वर्ल्ड्सची निर्मिती आहे. एका महिलेने दिलेला लढा, क्षमतांच्या पलीकडे जाऊन केलेला संघर्ष या सिनेमात दिसत आहे. आहे.या सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं आहे. या सिनेमाने जवळपास सात विभागात नामांकनं मिळवली होती. यात बेस्ट फिल्म’ यासोबतच ‘बेस्ट सिनेमॅटोग्राफी’ आणि ‘बेस्ट एडिटींग’ या विभागात पुरस्कार मिळवला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive