अभिनेता सुमीत राघवनने दिलं मेट्रोला समर्थन, जाणून घ्या सविस्तर

By  
on  

सध्या सगळीकडे मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरेमधील वृक्षतोडीमुळे उसळलेल्य जनक्षोभाच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी पुढे आले आहेत. पण असेही काही सेलिब्रिटी आहेत जे या प्रकल्पाचं समर्थन करत आहे. त्यापैकी एक आहे सुमीत राघवन. सुमीतची आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची एका कार्यक्रमाननिमित्त भेट झाली.

 

त्यावेळी अश्विनी यांच्या भाषणाने सुमीत प्रभावित झाला आहे. मेट्रोची बदलत्या काळातील गरज लक्षात घेऊन त्याने मेट्रोचं समर्थन करणारं ट्वीट केलं आहे. यावर नेटिझन्सनी सुमीतवर टीकाही केली आहे. काही दिवसांपुर्वी अमिताभ बच्चन यांनीही आरे 3 प्रकल्पाचं समर्थन केलं होतं. यानंतर त्यांच्या घराबाहेर निदर्शन करण्यात आली होती. तर आरे जंगलतोडीच्या विरोधात श्रद्धा कपूर, प्राजक्ता माळी, सुबोध भावे, लता मंगेशकर, आमीर खान यांनीही आवाज उठवला आहे.

Recommended

Loading...
Share