गानकोकिळा लतादीदींची इन्स्टाग्रामवर दणक्यात एन्ट्री

By  
on  

आपल्या जादुई स्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणा-या लतादीदींनी नुकतंच 90 व्या वर्षात पदार्पण केलं. पण या वयातसुध्दा त्यांचा उत्साह अगदी वाखाण्याजोगा आहे.देशातील प्रत्येक घडामोडींवर त्यांचं लक्ष असतं. त्या प्रत्येकासाठी एक आदर्शच आहेत. पण लतादीदींनी आता सर्वांना आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट केली आहे. लतादीदींनी नुकतंच इंस्टाग्रामवर आपलं अकाऊंट ओपन केलं आहे. आता ट्विटरनंतर त्या आपल्या लाखो चाहत्यांसोबत आता इंस्टाग्रामवरुन संवांद साधतील. 

इन्स्टाग्रामवर आल्यावर त्यांनी सर्वात प्रथम आपल्या आई वडिलांच्या फोटोचा  जुना अल्बम चाहत्यांसाठी पोस्ट केला. त्यानंतर त्यांनी आपली बहीण मीना मंगेशकर यांच्या सोबत काढलेला एक फोटो शेअर केला. लता दीदींची बहीण व प्रसिध्द संगीतकार मीना मंगेशकर यांचे आत्मचरित्र गेल्या वर्षी प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचा हिंदी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला. या पुस्तकाचे नाव ‘दीदी और मैं’ असे असुन हे पुस्तक हातात घेऊन काढलेला एक सुरेख फोटो लता दीदींनी आपल्या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट  केला आहे.

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Namaskar. Aaj pehli baar aap sabse Instagram pe jud rahi hun.

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Namaskar. Aaj pehli baar aap sabse Instagram pe jud rahi hun.

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar) on

 

 

 

Recommended

Loading...
Share