Teaser Out : पाहा बाळासाठी व्याकूळ झालेल्या आईची अंगावर शहारे आणणारी कहाणी 'हिरकणी'

By  
on  

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णी स्टारर  'हिरकणी' या ऐतिहासिक सिनेमाचा  टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर पाहताना अक्षरश: अंगावर शहारे येतात. घरी एकट्या असलेल्या आपल्या बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या आईची ही कथा आहे. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर बाळाला भेटण्यासाठी काळोखात गडाचा खडतर प्रवास करुन खाली उतरणारी हिरकणीची ही शौर्यागाथा आहे. 

सध्या सर्वत्र प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' सिनेमाची चर्चा आहे. 'कच्चा लिंबू' नंतर प्रसाद ओक दिग्दर्शित या ऐतिहासिक सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. नुकतंच 'हिरकणी'मधील 'शिवराज्याभिषेक' गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रसाद ओकला इंडस्ट्रीतील अनेक मित्रांकडून या सिनेमासाठी शुभेच्छा मिळत आहेत. 

या सिनेमात हिरकणीची प्रमुख भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर याचं उत्तर मिळालं. अभिनेत्री सोनाली हिरकणीची प्रमुख भूमिका साकारणार आहे. ही सिनेमाच्या टीमने  घोषणा केली . पुण्यातील चतुः शृंगी मंदिराच्या  सोनालीची घोड्यावरून मिरवणूक काढत सोनालीने हिरकणीच्या वेशभूषेत दिमाखात एंट्री घेतली होती.  

प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा बहुचर्चित सिनेमा २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 
 

Recommended

Loading...
Share